● अल्पवयीन विद्यार्थ्यी सूसाट वेगाने बेदरकारपणे वाहने दामटत असल्याचे काॅलेज, शाळांबाहेरचे चित्र.
● पालकांकडूनच मुलांच्या हातात दुचाकीची चावी मिळाल्याने ही मुले कुणालाही जुमानत नाही.
● शहरात वाहतूक पोलीस फक्त चौकात. मग गल्लीतून पळवाट काढणाऱ्या या बाइकवीरांना वेसन घालणार कोण?
पिंपरी, दि. १४( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील शाळा ,महाविद्यालये कोरोना नंतर हळूहळू सूरू झाल्या मात्र वाहतूक व्यवस्था नसल्याने अल्पवयीनांच्या हातात दुचाकीची चावी मिळू लागली आहे. शालेय परिसरात हे अल्पवयीन दुचाकीस्वार वेगवेगळी वाहन चालवण्याची जणू प्रात्यक्षिकेच करून दाखवत आहेत.
धनवान पालकांबरोबरच आज सर्वसामान्य कुटुंबातील पालकही आपल्या पाल्याचे भलतेच लाड करण्यात आपल्या पालकत्वाची सार्थकता मानतात. आमच्या वेळी आम्हाला सुखसोयी नव्हत्या म्हणून मुलांची हौस पुर्ण करतो असंही उत्तर द्यायला पालकांना काहीच चूकीचे वाटत नाही . आनंदात पालकांकडून त्याला मोबाईल किंवा दुचाकी भेट दिली जाते . पण आपला मुलगा, मुलगी अजुन अल्पवयीन आहे याचा विसर त्यांना पडलेला दिसतो.
मोबाईल टॉकिंग , रस्त्याच्या विरुध्द दिशेने वाहन चालविणे , मद्यपान करून वाहन चालविणे , अतिवेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविणे , क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी तथा माल वाहतूक करण्याचे प्रकार या अल्पवयीन चालकांकडून होत असल्याचे दिसून येते.
नवीन वाहतूक नियम (दंड )
1. विना लायसन वाहन चालवणे- 500 ऐवजी 5हजार रूपये.
2. लायसन रद्द असताना वाहन चालवणे- 1हजार ऐवजी 10 हजार रुपये.
3. स्पीड लिमिट ओलांडणे- 1 हजार रुपये.
4. गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे- 1 हजार ऐवजी 5 हजार रुपये.
5. ट्रीपल सीट- 200 ऐवजी 1हजार रुपये.
6. विनाहेल्मेट वाहन चालवणे- 500 ऐवजी 1 हजार रुपये.
7. विनाकारण हाॅर्न वाजवने- 500 ऐवजी 1हजार रुपये.
Comments are closed