पुणे ,१४ ( punetoday9news):- पुणे महानगरपालिका क्षेत्रात १६ डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेने परिपत्रकाद्वारे दिली आहे. तसेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही या विषयी माहिती दिली आहे.
पुण्यातील १ ली ते ७ वीचे वर्ग गुरुवारपासून !
पुणे मनपा हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग येत्या गुरुवारपासून (१६ डिसेंबर, २०२१) सुरु करण्याचा निर्णय आपण घेतला असून याची पालकांनी नोंद घ्यावी. pic.twitter.com/Kvse0mrGeL
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) December 14, 2021
या संदर्भात माहिती देताना महापौर मुरलीधर मोहळ म्हणाले, “पुणे शहरातील सर्व शाळा या १६ डिसेंबरपासून आपण सुरू करत आहोत. पहिली ते सातवी इयत्तेचे वर्ग हे १६ डिसेंबर रोजी सुरू होत आहेत. हा निर्णय करताना जिल्हाचे पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त सौरभ राव आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार व आमची सगळ्यांची चर्चा झाली आणि हा एकमताने निर्णय घेण्यात आला, की सर्व ज्या काही मार्गदर्शक सूचना करण्यात आलेल्या आहेत, त्या प्रमाणे त्या त्या शाळेमधील सर्व निर्जंतुकीकरण करणे, सोशल डिस्टंसिंगचं पालन योग्य पद्धतीने करणे, जे काही नियम असतील त्यानुसार योग्य पद्धतीने सगळ्या सूचना देऊन, अत्यंत चांगल्या पद्धतीने तिथली सगळी व्यवस्था तयार ठेवून या शाळा आता गुरूवारपासून सुरू होत आहेत.”
Comments are closed