पुणे दि.14( punetoday9news):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील महावीर चौक चिंचवड ते बिर्ला हॉस्पीटल डांगे चौक, भुमकर चौक ते मारुंजी वाय जंक्शन या रस्त्यावर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली यांना १५ डिसेंबरपासून सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत पुढील आदेशापर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक व ट्रॅक्टरची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही वाहने नियमीत ऊस वाहतूक करत असतात आणि वाहनांमध्ये जास्त वजन असल्याने व ट्रॉली जोडल्याने ती संथगतीने जात असल्याने रस्त्यावर वाहतूकीस अडथळा होवून वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महावीर चौक चिंचवड ते बिर्ला हॉस्पीटल डांगे चौक, भुमकर चौक ते मारुंजी वाय जंक्शन या रोडवर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली यांना १५ डिसेंबरपासून सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत प्रवेश बंदी करण्यात आली असल्याचे पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांनी कळविले आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!