पिंपरी,दि. १६(punetoday9news):- अलिबाग ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी दिंडी सोहळ्यात आलेल्या भाविकांचे मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांना थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटर, सॅनिटायझर, कापडी बॅग, फळे, मास्क आदींचे वाटप करण्यात आले.


पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, माजी नगरसेवक राजू लोखंडे, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विजूअण्णा जगताप यांच्या हस्ते भाविकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना राजेंद्र जगताप म्हणाले, की मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून अरुण पवार करत असलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी लावलेले हजारो वृक्ष डौलाने उभे आहेत. समाजातील उपेक्षित घटकांना नेहमीच मदत करत आलेले आहेत. वारकरी बंधू भगिनीना आवश्यक ती मदत केली जाईल, असेही राजेंद्र जगताप यांनी सांगितले.
पखवाज वादक ह .भ .प. गंभीर महाराज अवचार म्हणाले, की अरुण पवार हे अहोरात्र सेवाकार्य करत आहेत. त्यांच्या आई-वडिलांची खूप मोठी पुण्याई आहे. म्हणूनच ते निस्वार्थीपणे गरजू विद्यार्थी, अंध -अपंग विद्यार्थी, वारकरी सेवा, मुक्या प्राण्यांची सेवा, तसेच वृक्ष लागवडीचे सेवाकार्य निस्वार्थीपणे करत आहेत. वारीमध्ये आळंदी ते पंढरपूर संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात गेली सात वर्षे मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देत आहात, हे स्तुत्य आहे.
अरुण पवार म्हणाले, की अलिबाग ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी दिंडी सोहळ्यात आलेल्या भाविकांचे थंडीपासून संरक्षण व्हावे, या उद्देशाने भाविकांची सेवा करण्यात आली. संतांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचीही सेवा करीत असतो.
यावेळी ह. भ .प. कैलास कातळे, सामाजिक कार्यकर्त्या विजया नागटिळक, सामाजिक कार्यकर्ते किशोर अटट्गेकर,सामाजिक कार्यकर्ते अंगद जाधव, ह .भ. प. अर्जुन शिंदे, नगरसेविका चंदा लोखंडे, ह. भ .प . जयराम देवकर, ह .भ. प. मनोहर जगताप, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव तुपे, ह .भ .प. नारायण महाराज अण्णा, श्री दत्तजयंती पायी दिंडी प्रमुख गोपाळ कांबळे, चंद्रकांत रासकर, तसेच भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Comments are closed

error: Content is protected !!