औध,दि.17( punetoday9news):- कोविड19 मुळ पाचवी ते सातवीचे वर्ग दोन वर्षांच्या कालावधीनंतर शहरात शासनाच्या आदेशानुसार चालू झाले. त्यानुसार नियमांचे पालन करून आनंदी वातावरणात वह्या व सॅनिटायझर वाटप करत औध येथील श्री शिवाजी विद्यामंदिरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले. रांगोळी सजावटीतून कोरोना जागृती विषयी संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. वर्ग खोल्यांची सजावट करण्यात आली.
यावेळी प्रशालेच्या पर्यवेक्षिका भारती पवार, संस्थेचे कार्याध्यक्ष कांबळे वाय.जी. जेष्ठ शिक्षिका निलम जगताप, हिरा शेळके, शिक्षक प्रतिनिधी बिपीन बनकर, गायत्री देशमुख, अशोक गोसावी , शंकर बोराटे, सुषमा असवले, सुषमा लेंभे, राजश्री चव्हाण, रंजना इंदारी तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पहिल्याच दिवशी 50 ते 60 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
विद्यामंदिरात पाऊल टाकताना जुन्या आठवणींची शिदोरी पाठीशी घेऊन नव्या संकल्पनांचे क्षितिज गाठण्यासाठी विद्यार्थी प्रशालेत नव्या उमेदीने प्रवेश करताना दिसले. विद्यार्थ्यांचा किलबिलाट व त्यांचे उत्सुक व हसरे चेहरे पाहून शिक्षकांचाही आनंद द्विगुणित झाला.
नवहिंदवी युगाच्या शिल्पकारांचे शिक्षकांनी आनंदाने स्वागत केले.
Comments are closed