पिंपरी, दि. 17( punetoday9news):-   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा विभागीय समिती व श्रीमती सी . के . गोयल कला व वाणिज्य महाविद्यालय दापोडी यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन मुलींच्या कबड्डी स्पर्धेत तुळजाराम चतुरचंद्र महाविद्यालय बारामती या संघाने विजेतेपद पटकविले तर अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर यांना उपविजेतेपद मिळाले तृतीय क्रमांक भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयास मिळाला .

चिंचवड येथील श्री शिवाजी उदय मंडळ येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते , सदर स्पर्धेचा उदघाटन समारंभ श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कबड्डी संघटक शरद अण्णा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले . या प्रसंगी कबड्डी हा खेळ पूर्णपणे शारीरिक क्षमता व सराव कौशल्यावर अवलंबून आहे . कष्ट करण्याची जिदद असेल तर तुम्ही काहीही करू शकता असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थीनिंना केले . कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सचिन साठे , डॉ . शालिनी मल्होत्रा , नगरसेवक चंद्रकांत गावडे , मा . अपर्णाताई डोके , राजेश सावंत , पुणे जिल्हा क्रीडा विभागाच्या महसचिव डॉ . विदया पठारे तसेच शिवाजी उदय मंडळाचे अध्यक्ष सन्माननिय गोडसे काका उपस्थित होते .

खेळाडूंनी आपल्यामधील कार्यक्षमता ओळखावी व त्याप्रमाणे आपल्या क्रीडाकार्यमानात सातत्य राहावे यासाठी सतत प्रयत्नशील असावे , असे मत सचिन साठे यांनी व्यक्त केले .

स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी प्रा.वैभव वरडूले प्रा. अमरदिप गुरमे, हनुमंत गायकवाड , शिवाजी उदय मंडळाचे गोडसे यांनी सहकार्य घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमरदिप गुरमे यांनी केले . प्रास्ताविक व स्वागत प्रभारी प्राचार्य डॉ . सुभाष सुर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा . डॉ . शोभा ( भगत ) शिंदे यांनी केले .

Comments are closed

error: Content is protected !!