पिंपरी, दि. १८( punetoday9news):-  पुणे शहरातील भरदिवसा कात्रज येथील गोळीबाराची घटना ताजी असताना आज पुन्हा पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौक येथे दत्त मंदिसासमोर युवकावर गोळीबार झाला आहे.  यात युवक गंभीर जखमी झाला आहे.

प्राथमिक माहिती नुसार योगेश जगताप ( पिंपळे गुरव) या युवकावर अज्ञात तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला असून युवक गंभीर जखमी झाला आहे. उपचारासाठी युवकास हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. आज हल्याच्या ठिकाणी दत्त जयंती कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते याच संधीचा फायदा घेत सकाळी 10 च्या सुमारास हा गोळीबार झाला आहे. या झालेल्या घटणेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बघ्यांची गर्दी वाढल्याने ट्रॅफिक जॅम ची समस्या निर्माण झाली आहे.

सदर घटनेचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

Comments are closed

error: Content is protected !!