दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

कासारवाडी, दि १८ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी येथील श्रीदत्तसाई सेवा कुंज आश्रम मंदिरात दत्त जन्माचे किर्तन हरिभक्त परायण कैलास महाराज खंडागळे यांनी केले. नेवासा उतार करण्यासाठी दत्तात्रयांनी अवतार धारण केला. दत्त जन्माचा महिमा महाराजांनी आपल्या वाणीतून वर्णन केला.
दत्त हे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते.

दुपारी निवृत्ती घाणेकर गुरुजी व सहकाऱ्यांनी दत्तप्रभुची भक्ती गीते गायन केली. दत्त जन्मोत्सव निमित्ताने भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांसाठी दत्त जन्मानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते.

सप्ताहाच्या निमित्ताने आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवार यांच्या वतीने पत्रकार बंधू-भगिनीं , डॉक्टरांचा श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिवानंद स्वामी यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचालन प्रा.संपत गर्जे व श्रीकांत चौगुले यांनी केले.

यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, सुभाषदादा काटे, माऊली जगताप, करंजुले नाना, विजयशेठ जगताप, मा.नगरसेवक शंकरशेठ जगताप, विलास काटे, बाबासाहेब बागल, पोपटराव शिवले,संजय मराठे, डाॅ.देविदास शेलार, बाळासाहेब जाधव, विशाल गुंडगळ, उज्वला गावडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Comments are closed

error: Content is protected !!