वाकड,दि.१९( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड मधील वाकड परिसरात प्रियकरानेच प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अगोदर प्रियकराने प्रेयसीच्या आत्महत्येचा बनाव रचला होता.
पिंपरी – चिंचवडमध्ये लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे . अगोदर प्रियकराने प्रेयसीने आत्महत्या केली असल्याचा बनाव रचला होता . मात्र , शवविच्छेदन अहवालात तरुणीचा गळा दाबून खून केल्याचं निष्पन्न झालं . या प्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . हा सर्व प्रकार ओयो हॉटेल टाऊन येथे घडला आहे . या प्रकरणी मयत तरुणीचे वडील अशोक नारायण गवारे यांनी वाकड पोलिसात तक्रार दिली आहे . हेमंत अशोक मोहिते ( वय २९) असं आरोपी प्रियकराचं नाव आहे.
सपना अशोक गवारे ( वय २७ ) असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे . हेमंतवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे , अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ . विवेक मुगळीकर यांनी दिली आहे . मृत प्रेयसी सपना आणि हेमंत मूळ वाशी उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सपना आणि हेमंतचे एकमेकांवर प्रेम होते . ते पिंपरी चिंचवडमध्ये २ दिवसांपूर्वी ओयो हॉटेल टाऊन येथे राहण्यास आले होते . रूम नंबर ३०१ मध्ये दोघे जण थांबले होते . हेमंत हा सपनाकडे विवाह करण्यास तगादा लावत होता . त्याला सपनाने नकार दिला होता . याच रागातून हेमंतने बाथरूमध्ये सपनाचा स्कार्फने गळा दाबून खून केला . त्यानंतर घाबरलेल्या हेमंतने प्रेयसीने आत्महत्या केली आहे असा बनाव रचला .
घटनेनंतर सपनाला तातडीने खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं . मात्र , शवविच्छेदन अहवालात तिचा गळा आवळला असल्याचं निष्पन्न झाले . तसेच , घटनास्थळी झटापटीत बाथरूमची खिडकी फुटलेली होती . एकूणच घटनास्थळ आणि ते राहत असलेली रूम पाहता तिचा खून झाला असल्याचा पोलिसांना संशय आला . अखेर शवविच्छेदन अहवालात पोलिसांचा संशय खरा ठरला . हेमंतच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लोहार हे करत आहेत .
Comments are closed