पिंपरी, दि. १९( punetoday9news):- पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार आणि त्यांचे बंधू उद्योजक बालाजी पवार यांनी दातृत्वाची पुन्हा प्रचिती देत गोशाळा चाऱ्यासाठी आर्थिक निधी गोशाळेला सुपूर्द केला.
श्री दत्त जयंती जन्मोत्सवानिमित्त कासारवाडीतील श्री दत्त साई सेवा कुंज येथील महोत्सवात ह. भ. प. अंकुर महाराज साखरे बीड गेवराईकर यांच्या कीर्तन सोहळ्याच्या दिवशी हा मदतीचा धनादेश ह.भ.प. शिवानंद स्वामी महाराज यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी भंडारा डोंगर समितीचे बाळासाहेब काशीद, ह. भ. प. जगन्नाथ नाटक पाटील, ह.भ.प. जोपाशेठ पवार, ह.भ.प. कैलाश कातळे, प्रवचनकार प्रा. संपत गर्जे, ह.भ.प. उमेश कुंदे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ह.भ.प. शिवानंद स्वामी महाराज यांनी सांगितले, की या अगोदरही अनेक गोशाळांना चाऱ्यारुपी मदत केली आहे. गाय आणि माय गोमाता वाचली पाहिजे याच उदात्त भावनेतून अरुण पवार व बालाजी पवार मदत करत असतात. जेवढे माणसांसाठी सेवाकार्य करतात, तेवढेच मुक्या प्राण्यांसाठी सेवाकार्य करत असतात. वन्य प्राण्यांसाठीही खूप मोठी मदत दरवर्षी पवार बंधू करीत आले आहेत.
ह.भ.प. बाळासाहेब काशीद यांनी मनोगत व्यक्त करताना अरुण पवार यांच्या दातृत्वाचे कौतुक करीत असा दानशूर सुपुत्र निर्माण होणे, हे आई – वडीलांची पुण्याई असते, असे गौरवोद्गार काढले. ह.भ.प. जगन्नाथ नाटक पाटील यांनी अरुण पवार हे उद्योजकातील दानशूर व्यक्ती आहेत, असे सांगितले. अरुण पवार यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवचनकार प्रा. संपत गर्जे यांनी केले.
Comments are closed