♦ रुपाली चाकणकर यांच्या हस्ते उद्घाटन; रुपालीताई ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती

♦ पद्मश्री राहीबाई पोपेरे, सविता पावसकर, शारदा मुंडे करणार मार्गदर्शन.

पिंपरी,दि. १९ ( punetoday9news):-  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, माजी सभापती राजू लोखंडे यांच्या वतीने महिला स्नेहमेळावा, रोजगार मार्गदर्शन शिबिर व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मेळावा सोमवारी 20 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर महिलाध्यक्ष वैशाली काळभोर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात महिलांना बीजमाता राहीबाई पोपेरे, बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकारी सविता पावसकर, प्रबोधनकार शारदा मुंडे या रोजगार मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, नगरसेवक मयूर कलाटे, प्रवक्ते फजल शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेविका माई काटे, माजी नगरसेविका शोभाताई आदियाल, सुषमा तनपुरे, उज्ज्वला ढोरे, तृप्ती जवळकर, ऍड. प्रिया देशमुख, संजीवनी पुराणिक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप, उपाध्यक्ष तानाजी जवळकर, अमरसिंग आदियाल, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, हुसेन मुलानी, अनुसूचित जमाती शहर जिल्हाध्यक्ष प्रा. विष्णू शेळके, गोर बंजारा समाज संस्थेचे अध्यक्ष संदीप राठोड, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव तुपे, अनिस पठाण, उद्योजक बालाजी पवार, अभिषेक जगताप आदी उपस्थित राहणार आहेत.

 


Comments are closed

error: Content is protected !!