– भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण
– स्पर्धेत तब्बल ३०० हून अधिक खेळाडुंचा सहभाग; प्रशिक्षकांचाही सन्मान
पिंपरी,दि. २०( punetoday9news):-
श्रीशा स्केटिंग क्लब आणि चोंधे पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या ओपन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात पार पडल्या. रविवारी (दि. १९) झालेल्या या स्पर्धेत तब्बल ३०० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक फोनिक्स स्पोर्टस क्लब (प्रशिक्षक रामदास लेकावले), द्वितीय पारितोषिक युवराज स्पोर्ट्स क्लब (प्रशिक्षक चंद्रकांत बसे) यांना मिळाले. तिसरे पारितोषिक सराई स्पोर्टस क्लब (प्रशिक्षक प्रशांत परसवार) आणि ड्रीमस स्पोर्टस क्लब (प्रशिक्षक वैभव आणि राहुल बिलगी) या दोन संघांना विभागून देण्यात आले. चौथा क्रमांक मिरॅकल स्पोर्टस क्लब (प्रशिक्षक मुकेश कोंडे, मकसूद शेख) आणि पाचवा क्रमांक मासा स्केटिंग क्लब (प्रशिक्षक महेश वाघे) या संघास मिळाला.
बिगिनर्स, क्वाड, फॅन्सी इनलाईन आणि प्रोफेशनल इनलाईन या चार प्रकारांमध्ये ही स्पर्धा झाली. पिंपरी-चिंचवड भाजपा युवा अध्यक्ष संकेत चोंधे आणि प्रणव यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रियंका येडलवार, प्रशांत पारसवार, चंद्रकांत बसे, महेश वाघे, नितेश जगताप, निलेश जगताप आदींनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले.
Comments are closed