पुणे दि.२१( punetoday9news):- राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त २४ डिसेंबर रोजी वाकडेवाडी शिवाजीनगर बसस्थानक पुणे येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विविध विभागाच्यावतीने ग्राहक जागृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवाजीनगर बसस्थानक येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सचिव सुरेखा माने यांनी केले आहे.
Comments are closed