पिंपरी,दि. २१( punetoday9news):- इंटरनॅशनल शोतोकॉन कराटे ऑर्गेनायझेशनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी चिंचवड येथील उमेश लोंढे यांची निवड करण्यात आली .
याबाबत निवडपत्र इंटरनॅशनल शोतोकॉन कराटे ऑर्गेनायझेशन चे भारतीय अध्यक्ष विरेंद्र अग्रवाल यांच्या कडून देण्यात आले .
उमेश लोंढे यांनी गेली अनेक वर्षे मार्शल आर्ट कराटे क्षेत्रात अत्यंत भरीव योगदान दिले आहे . अपंग व मतिमंद मुलांना तसेच महिलांकरीता , अंध , अपंग , विधवा यांच्या पाल्यांकरिता , आर्थिकरित्या दुर्बल विद्यार्थ्यांकरिता मोफत ब्लॅक बेल्ट पर्यंतचे प्रशिक्षण गेली अनेक वर्षे देत आहेत . वृध्द व जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान योगासने व प्राणायाम चे प्रशिक्षण देत आहेत . तसेच क्रीडा व संरक्षण खात्यामध्ये अनेक वर्ष सेवा दिली आहे . आतापर्यंत त्यांनी क्रिडा शिक्षक , संरक्षणगृह दलात निदेशक , स्काऊट प्रशिक्षक योग शिक्षक , अग्निशमन प्रशिक्षक , क्रिडा मार्गदर्शक , मुख्य प्रशिक्षक असे अनेक राजकीय, निमशासकीय क्रिडा स्पर्धा शिबीर स्वसंरक्षण कार्यक्रमाचे आयोजन करून समाजात सामाजिक क्रिडा संदेश पोहचवला आहे .
Comments are closed