पिंपरी, दि.२३( punetoday9news):- जनता शिक्षण संस्थेच्या दापोडीतील श्रीमती. सी.के. गोयल कला वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर खेड तालुक्यातील दावडी येथे दि.२६ डिसेंबर ते दि. १ जानेवारी  या कालावधीत संपन्न होणार आहे.

याप्रसंगी आमदार दिलीप मोहिते, पं.स.सभापती  अरुण चौधरी, उपसभापती वैशाली गव्हाणे, जनता शिक्षण संस्था अध्यक्ष पोपटराव देवकर, जनता शिक्षण संस्था सचिव सुभाषराव गारगोटे, सरपंच  संभाजी घारे, ग्रामपंचायत सदस्य, व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिबिरामध्ये श्रमदान, व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, याबरोबर समाज प्रबोधन, महिला सबलीकरण, कोरोना जनजागृती, आरोग्य जागृती, ग्रामस्वच्छता, पर्यावरण जागृती, वृक्ष संवर्धन, जलसंधारण, अक्षय उर्जा जागृती, व्यक्तिमत्व विकास, ग्राम सर्वे, इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
तसेच व्याख्यानमालेत पुढील विषयावर व्याख्यान होणार आहे.  शिवछत्रपती शिवाजी महाराज- संपत गारगोटे, सतीश सुरवसे- कथाकथन, अतुल सवाखंडे-सर्प समज-गैरसमज, ज्ञानदेव निटवे-व्यक्तिमत्व विकास, मनोहर मोहरे-संस्कार रूजवा जीवन फुलवा, दीक्षा शिंदे-मी सावित्री बोलतेय, या विषयांवर व्याख्याने होणार आहे.
संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मनोरंजन प्रबोधन अंतर्गत समाज प्रबोधन पर प्रसंग नाट्य, वराड निघाले लंडनला- एक पात्री प्रयोग, संमोहन कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम, वैयक्तिक- सामुहिक नृत्य, मिमिक्री, मॉडेल्स यासारखे कार्यक्रम होणार आहेत.

सात दिवसीय शिबिरामध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे एकूण 75 विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

शिबिराचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ बाळासाहेब माशेरे, प्रा. सिद्धार्थ कांबळे, प्रा. दिपाली खर्डे, प्रा. उत्तम गोरड, प्रा. दर्शन बागडे, प्रा. अमरदीप गुरमे हे करणार असून महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सुभाष सूर्यवंशी यांचे शिबिरासाठी मार्गदर्शन लाभणार आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!