पुणे , दि. 23( punetoday9news):- कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ” ओमिक्रॉन ” ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे . या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये  फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे . या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन बांधवांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात एकत्र न येता नाताळचा सण साजरा करणे अपेक्षित आहे .

त्या दृष्टीने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत :

१. ख्रिश्चन बांधवांनी या वर्षी देखील नाताळचा सण आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्णत : खबरदारी घेऊन साध्या पध्दतीने साजरा करावा .

२. कोवीड- १ ९ च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन महसूल व वन , आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन विभागाने दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करणे अत्यावश्यक आहे .

३. नाताळ निमित्ताने चर्चमध्ये उपलब्ध आसनक्षमतेच्या ५० % पर्यंत लोकांना चर्चमध्ये उपस्थित राहण्यास परवानगी असेल . चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व Social Distancing राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे . तसेच चर्चमध्ये निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी .

४. नाताळच्या दिवशी चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे , ख्रिसमस ट्री अगर काही वस्तू ठेवल्या जातात . त्या ठिकाणी Social Distancing व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात .

५. चर्चमध्ये प्रभु येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत  गाण्यासाठी कमीत कमी गायकांचा समावेश करण्यात यावा . त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे .

६. चर्चच्या बाहेर , परिसरात दुकाने अगर स्टॉल लावू नयेत .

७. सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे .

८. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक , सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये .

९ . फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये . ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटकोर पालन करण्यात यावे .

१०. कोविड- १९ व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी   आरोग्य , पर्यावरण , वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगर पालिका , पोलीस , स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील .

तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष नाताळ उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे .

असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!