पिंपरी,दि. २४( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथे फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन आण्णा भाऊ साठे विचार मंच व प्रभास केसरी यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा चंद्ररंग समुहाचे संचालक व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते ‘समाज भुषण’ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर दुर्घटनेतील लष्कर अधिकारी बिपिन रावत व सहका-यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.    यात सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे, संदिप गायकवाड, आदिती निकम, कृष्णा भंडलकर, रंजना शिंदे, नगरसेवक संतोष कांबळे यांना सन्मान चिन्ह, गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला.     याबरोबर यश ज्येष्ठ नागरिक संघाच्या ज्येष्ठांचा उपस्थितांच्या हस्ते वाढदिवस साजरा करण्यात आला. संघाचे अध्यक्ष साहेबराव कांबळे, बाळासाहेब सोनवणे, दिलिप तनपुरे, चंद्रकांत बाराथे, विजय भोसले, रामभाऊ उप्पर, भिकन कांबळे आदी उपस्थित होते.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!