मावळ, दि. २५( punetoday9news):-   श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळच्या कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना ( NSS) श्रमसंस्कार शिबिरात ‘महापुरुष आणि आजचा तरुण’ या विषयावर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांसाठी मावळ तालुक्यातील साई येथे व्याख्यान संपन्न झाले.

 यावेळी शिवव्याख्याते संपत गारगोटे म्हणाले की, “महापुरुषाचा आदर्श  तरुणांनी जर घेतला तर हा देश नक्कीच महासत्ता होईल कारण छत्रपती शिवाजी, महाराज छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज त्याचबरोबर अनेक महापुरुषांच्या  सपन्न वारसा आपल्याला मिळाला आहे आणि जर या महापुरुषांचा आदर्श आपण घेऊन आपले आचरण त्यानुसार ठेवले तर  समाज परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपण नक्कीच यशस्वी होऊन समाज प्रगतशील आणि संपन्न बनेल.”

           यावेळी कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाधिकारी पत्रकार आणि ज्युनिअर मकरंद अनासपुरे, प्रा. महादेव वाघमारे व सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

 


Comments are closed

error: Content is protected !!