पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची माहिती.
पिंपरी,दि. २८( punetoday9news):-
सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्रमाणभूत मानून गेली 28 वर्षे महाराष्ट्रभर संघटनात्मक जाळे निर्माण करीत नावारूपाला आलेल्या छावा मराठा संघटनेच्या 28 व्या वर्धापनदिनानिमित्त 1 जानेवारी 2022 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे होणार्या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमाचे उद्घाटन बडोदा संस्थानचे महाराजा सत्यजित गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषीमंत्री दादासाहेब भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आदी उपस्थित राहणार आहेत. वर्धापन दिनानिमित्त संघटनेने आपल्या 28 वर्षामध्ये केलेल्या कार्याचा आढावा, तसेच संघटनेच्या पुढील कार्याचे नियोजन करण्यात येणार आहे. सामाजिक, तसेच राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. देशासाठी शहीद झालेल्या सुपुत्रांच्या कुटुंबांप्रती परिवारासह जाहीर कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. याबरोबरच वर्धापनदिन कार्यक्रमानिमित्त कोविड लसीकरण, आरोग्य निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी वर्धापनदिन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन छावा मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, प्रदेश सरचिटणीस योगेश केवारे पाटील यांनी केले आहे, असेही रामभाऊ जाधव यांनी सांगितले.
रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षण लढ्यात शहीद झालेल्या मराठा मुलांच्या परिवाराला दहा लाख रुपयांची मदत केली असून, काही जणांना नोकरी दिलेली आहे. शिक्षण विभागातील 133 जणांना नोकरीत सामावून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे अजून मराठा समाजाचे अनेक प्रश्न सरकारकडे प्रलंबित असून, या अधिवेशनात सरकारसोबत प्रत्यक्ष चर्चा करून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येतील.
Comments are closed