पिंपरी,दि.२९ ( PUNETODAY9NEWS):- आदिम वधू वर सूचक केंद्र महाराष्ट्र आयोजित 45 आदिवासीं जमतींचा 8 वा मेळावा पिंपरी चिंचवड च्या पिंपळे गुरव मधील सौ. सुरेखाताई भालचिम सभागृहात विविध जमातींच्या उपवर विवाहेछुक उमेदवारांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला कार्यक्रमात 38 मुले व 63 मुलींची नोंदणी करण्यात आली.
कार्यक्रमाला पुणे महानगर पालिकेचे उप अभियंता वनराज बांबळे हे उद्घाटक म्हणून लाभले त्यांनी आपल्या मनोगतात आदिवासी वधू वर परिचय मेळावे यांची गरज आणि महत्व विषद करुन वर वधू संशोधनासाठी घेण्याच्या दक्षते बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पुणे पिंपरी चिंचवड शहरात डोंगरी जंगलवस्तीतून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला जवळपास 2 लाखांहून अधिक आदिवासी समाज नोकरी धंद्या निमित्त स्थिरावला आहे रहिवासी आहे त्याच्या उपवर मुलामुलींसाठी सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबविला जात असल्याचे व संस्थेमार्फत ठाणे नाशिक अमरावती नागपूर याही ठिकाणीं यापूर्वी अशा स्वरुपाचे मेळावे आयोजित केले होते अशी माहिती आदिम वधू वरचे संस्थापक अध्यक्ष आण्णाभाऊ शेळके यांनी दिली.
कार्यक्रमास माजी नगरसेवक राजेंद्र जगताप उद्योगपती अरूण पवार यांनी आवर्जून उपास्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले व सर्वांना भावी आयुष्यासाठी सूखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी सह्याद्री विकास संस्थेचे अध्यक्ष कृष्णा भालचिम, मार्गदर्शक कार्याध्यक्ष गुलाब हिले होते त्यांनी संस्थेने नव्याने उभारलेल्या बहुउद्देशीय सभागृहाची माहिती दिली
कार्यक्रमास स्थानिक नगरसेविका उषा मुंढे यांनी उपस्थित वधू वर व त्याच्या पालकांना शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाचे सूत्र संचालन वधू वर परिचय संस्थेच्या आयोजन समितीचे प्रमुख देवराम चपटे, उमाताई गभाले यांनी केले
कार्यक्रमाच्या आयोजनात भगवान ढेंगळे, श्यामा घोडे, राणी आढारी, अनिता गभाले, जयमाला मराडे, प्रियंका घोटकर, आत्राम, रोहिणी शेळके, सुर्यकांत कोंढवळे, दुर्गा पारधी, श्रेया वरे, मिनल भालिंगे यांचा सिंहाचा वाटा होता.
उपस्थितांचे आभार राजाभाऊ वालकोळी यांनी मानले
Comments are closed