पिंपरी,दि.३०( punetoday9news):- म्हाडा मोरवाडी अजमेरा – मासुळकर काॅलनी येथील सामाजिक कार्यकर्ते  दिपक भोजने यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य शासन व महानगरपालिका अंतर्गत राबविण्यात असलेल्या विविध शासकीय अनुदान योजनेची माहिती व मार्गदर्शन शिबीर मोरवाडी मध्ये संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक संघ मोरवाडीचे अध्यक्ष माडगूळकर होते. आनंद बनसोडे यांनी विविध शासकीय योजनेची माहिती दिली व मार्गदर्शन केले त्यानी आजपर्यंत १५० ते २०० निराधार , दिव्यांग व अपंग यांना योजनांचा लाभ मिळवून दिला. या शिबीरात परिसरातील ६५ ते ७० निराधार , दिव्यांग व अपंगानी सहभाग घेतला.
यावेळी  प्रविण भोसले , साईनाथ कांबळे सामाजिक कार्यकर्त्यां शमा सय्यद  प्रा.दत्तात्रय कोकाटे  पाटील उपस्थित होते. रजनीकांत गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले व  रेणुका भोजने (गजबरे )आभार मानले

#

Comments are closed

error: Content is protected !!