पिंपरी, दि. १( punetoday9news):-
श्री सदगुरु बाळूमामा यांच्या कार्याचा व विचाराचा वारसा घेवून समाजातील गोरगरीब, अनाथ व गरजू लोकांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या श्रीसदगुरु बाळूमामा संस्थेच्या दिनदर्शिकेचे माजी उपमहापौर व नगरसेवक सचिन चिंचवडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडू मारकड पाटील, काकासाहेब मारकड, डॉ. बाळासाहेब सोनवणे, धनराज गरड, प्रसाद पाटील, सचिन सलगर, तानाजी कोपनर, बिरमल मारकड, दिनेश गडदे, राहुल चव्हाण, प्रभाकर कोळेकर, सचिन कोपनर, नागनाथ वायकुळे, सुरेश मारकड, परमेश्वर कोपनर, बापू गोरे आदी उपस्थित होते.
सचिन चिंचवडे यांनी सांगितले, की या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य, पर्यावरण, धार्मीक व सामाजिक क्षेत्रात विविध विधायक उपक्रम राबवून पाटील यांनी संस्थेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले आहे.
संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजोपयोगी उपक्रम राबवून अनाथ, गोरगरीब अनाथ जनतेच्या हितासाठी व पर्यावरणाच्या रक्षणासाठी संस्था वचनबद्ध असल्याची ग्वाही यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडू मारकड पाटील यांनी दिली. तसेच संस्थेच्या वतीने पाच हजार दिनदर्शिकेचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Comments are closed