शौर्य दिनाच्या आयोजनात पहिल्यांदाच सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार.

पुणे, दि. १( punetoday9news):- ऐतिहासिक भिमा कोरेगाव जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी देशातील विविध राज्यातून  आलेल्या अनुयायायांनी शौर्य दिनानिमित्त जयस्तंभाला मानवंदना दिली.

१ जानेवारी १९२७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव जयस्तंभास पहिल्यांदा मानवंदना दिली तेव्हापासून १ जानेवारी रोजी लाखोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी  जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येत आसतात.

भीमा कोरेगाव जयस्तंभ परिसराचा विकास करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच  १०० कोटी निधी देणार असल्याची घोषणा केली. भीमा कोरेगाव विजय स्तंभ परिसराचा विकास करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली भीमा कोरेगाव शौर्य समिती गठीत केली असून समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या नियंत्रणाखाली ही समिती काम  करत  आहे. बार्टीचे महासंचालक  धम्मज्योती गजभिये यांनी शौर्य दिनी अनुयायांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनातील सर्व शासकीय यंत्रणांशी समन्वय  साधून शौर्य दिनाचे उत्कृष्ट नियोजन केले. सामाजिक न्याय विभाग व बार्टी संस्थेच्यावतीने शौर्य दिनाचे नियोजन करण्यात  आले .

यावेळी सर्व अनुयायांना माहिती पुस्तिकेद्वारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व बार्टी संस्थेतील विविध उपक्रम व योजनांची माहिती देण्यात आली तसेच महापुरुषांच्या सामाजिक समता विचारावर आधारित पुस्तकांची विक्री करण्यात आली  त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या मान्यवरांचे बार्टीच्यावतीने सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन धम्मज्योती गजभिये, इंदिरा अस्वार यांनी स्वागत केले. भीमा कोरेगाव परिसरात पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला. जिल्हा परिषद पुणे महानगरपालिका यांच्यावतीने अनुयायांना  पिण्याचे  पाणी, फिरते शौचालय, पीएमपीएल बस, आरोग्य केंद्र, आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!