सन्मानचिह्न देऊन दावडी ग्रामस्थांनी केला विद्यार्थ्यांचा सन्मान.
पिंपरी, दि. २( punetoday9news):- खेड तालुक्यातील दावडी येथे श्रीमती. सी.के. गोयल कला वाणिज्य महाविद्यालय, दापोडीचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ शनिवार( दि.१) संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी विजय शिंदे, संभाजी घारे,(सरपंच) राणी डुंबरे, पुष्पा मोरे, अनिल नेटके,(ग्रामपंचायत सदस्य) रामदास बोत्रे, गणेश लोणकर, राजाराम कदम, बाळासाहेब वाघिरे,(मा. चेअरमन सोसायटी) आत्माराम डुंबरे (पोलीस पाटील) रमेश होरे, बबन होले, प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष सूर्यवंशी, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, प्रा. सिद्धार्थ कांबळे, प्रा.दिपाली खर्डे आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायत दावडी यांच्यावतीने श्रीमती. सी.के. गोयल महाविद्यालयास शिबिर कालावधीतील चांगल्या कामाबद्दल “सन्मानचिन्ह” सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. व सर्व शिबिरार्थींचा यथोचित सन्मान करण्यात आला.
शिबिराच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विजय शिंदे म्हणाले”राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होत असून ग्राम विकासाला निश्चित दिशा मिळत आहे”
या शिबीरार्थींनी सात दिवसीय शीबिरामध्ये विविध उपक्रम राबवले यामध्ये सार्वजनिक ठिकाणच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. वृक्षारोपण करून अस्तित्वात असलेल्या झाडांना आळी करून पाणी देण्यात आले. सांडपाण्याची व्यवस्था दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, जलसंधारण विषय कामेही करण्यात आली. प्रबोधन उद्बबोधन उपक्रमात संपत गारगोटे यांचे “शिवछत्रपती “या विषयावर व्याख्यान झाले. तसेच सतीश सुरवसे: “कथाकथन” अतुल सवाखंडे :”सर्प समज-गैरसमज”, डॉ.ज्ञानदेव निटवे :”व्यक्तिमत्व विकास”, मनोहर मोहरे: “संस्कार रुजवा जीवन फुलवा”, दीक्षा शिंदे:” मी सावित्री बोलतेय”या विषयांवर व्याख्याने संपन्न झाली . सांस्कृतिक कार्यक्रम उपक्रमातून अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण जागृती, स्त्रीभृण हत्या जागृती, आरोग्य जागृती, कोविड विषयक जागृती, ग्रामस्वच्छता अभियान विषयक जागृती, वृक्षसंवर्धन याबाबत जागृती, व्यसनमुक्ती बाबत जागृती, आदी विषयांवर प्रसंग नाट्य सादर करण्यात आली.
शिबिरात एकूण ७५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
शिबिराचे संयोजन प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे, प्रा. सिद्धार्थ कांबळे, प्रा.दिपाली खर्डे, यांनी केले.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, डॉ.सुभाष सूर्यवंशी, दावडी गावचे सरपंच मा.संभाजी घारे, ग्रामपंचायत सदस्य, हे सोसायटी चेअरमन, सदस्य, पोलीस पाटील, श्रीमंत फत्तेसिंह गायकवाड विद्यालयाचे मुख्याध्यापक, ग्रामसेवक व इतर सर्वांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे यांनी केले. आभार सरपंच संभाजी घारे यांनी मानले.
Comments are closed