आमदार क्रिकेट चषक स्पर्धा: पत्रकार संघ वि. पोलीस संघ सामन्यातील विजयी पोलीस संघ.

 ? आमदार क्रिकेट चषक स्पर्धेतील मैत्रीपूर्ण रंगतदार सामन्यात पोलीस संघ विजयी.

?लॉक डाऊन पासून कामकाजात व्यस्त असलेले पत्रकार व पोलीस यांनी क्रिकेट चा मैत्रीपूर्ण सामना खेळत आनंद साजरा केला.

 

सांगवी, दि. १( punetoday9news):-  सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. नियोजनबद्ध अशा सामन्यांमध्ये कोरोना विषयक सर्व नियमांचे ही काटेकोर पालन होताना दिसत आहे.  या सामन्यांचे उत्तम नियोजन अजय दुधभाते, मनीष कुलकर्णी निलेश जगताप यांनी केले आहे. 

आमदार क्रिकेट चषक स्पर्धेत सहभागी पत्रकार संघ .

या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक संघांनी सहभाग घेतला आहे. याच औचित्याने सांगवीतील PWD मैदानावर पत्रकार आणि पोलिस संघात क्रिकेट चा सामना पाहायला मिळाला. यात पोलिस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी चा निर्णय घेवून मोठी धावसंख्या उभारली.  त्याचा पाठलाग करत पत्रकार संघानेही चांगली फलंदाजी केली मात्र विजयी धावसंख्या उभारण्यात पत्रकार संघ अपयशी ठरला.

सांगवीतील आमदार क्रिकेट चषक स्पर्धेतील मैत्री सामन्यात punetoday9news चे संपादक सागर झगडे सन्मानचिन्ह स्वीकारताना.

कर्णधार मिलिंद संधान यांनी उत्तम गोलंदाजी व क्षेत्ररक्षण करत पोलिस संघातील दोन फलंदाज बाद केले.

या खेळात उत्तम फलंदाजी व गोलंदाजी करत पोलिस संघाने विजय मिळवला. या सामन्यात ३५ धावा करत पोलीस संघातील फलंदाज दिलीप जाधव यांना मॅन ऑफ द मॅच किताब पटकवला.

अजय दुधभाते, दिपक मंडले , प्रदिप गुळमिरे व इतर सहकाऱ्यांनी परिसरातील क्रिकेट रसिकांसाठी सुसज्ज सुविधापूर्ण अशा क्रिकेट सामन्याचे आयोजन व नियोजन केले आहे. त्याबद्दल क्रिकेट खेळाडू व प्रेक्षकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!