सांगवी, दि. २( punetoday9news):- कोरोनाच्या विळख्यात संपूर्ण जग सापडले असताना ओमायक्राॅन सारखे नवीन व्हेरीयंट येत आहेत यामुळे संपूर्ण जगभरात धास्ती वाढली आहे. कोरोना पेक्षा वाढीचाही दर जास्त प्रमाणात आहे. याचे गांभीर्य ओळखून दिलासा संस्था व मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने सांगवीतील मजूर अड्ड्यावर पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली.
देशात सद्यस्थितीत ओमायक्राॅनचे जवळपास 1400 रुग्ण आहेत तर महाराष्ट्रत 460 रुग्ण आहेत तर राज्यातील कोरोना बाधितांचा आकडाही 10 हजारांच्या जवळ गेला आहे.
मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी आपल्या शर्टवर घातक कोरोनाचे चित्र काढून कोरोना, ओमिओक्राॅन विषयी जनजागृती केली.
यावेळी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, सांगवी पिंपळे गुरव असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदिप ननवरे, विकास कुचेकर,
प्रकाश घोरपडे, पंकज पाटील, मुरलीधर दळवी, विजया नागटिळक, शामराव सरकाळे, संगिता जोगदंड, मीना करंजावणे, विकास शहाणे,हनुमंत पंडीत, वसंत चकटे, ऋतुजा जोगदंड, एकनाथ उगळे, डॉ पी एस अग्रवाल,शरद शेजवळ, विनायक विसपुते उपस्थित होते.
यावेळी 500 मास्कचे मजूरांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम गीताने झाली.
प्रास्ताविक सुरेश कंक यांनी केले तर आभार श्रीकांत चौगुले यांनी केले.
Comments are closed