पिंपरी, दि. ३( punetoday9news):- क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहर आम आदमी पार्टी च्या वतीने अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. 

३ जानेवारी २०२१ रोजी सुरू केलेल्या आम आदमी पार्टी जनसंपर्क कार्यालयाला १ वर्ष पूर्ण झाले आहे त्यानिमित्त पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या गरजू नागरिकांसाठी ई-श्रम कार्ड च्या वाटपाची सुरुवात देखिल करण्यात आली.

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड च्या वतीने गेल्या वर्षभरात शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. प्रामुख्याने जागृती पालक संघटना, कष्टकरी घरेलू महिला कामगार संघटना तसेच आम आदमी रिक्षा चालक संघटना या संघटना स्थापन केल्या व त्यामाध्यमातून विविध उपक्रम राबवले गेले.

ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश परदेशी, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर ननावरे, आप चे संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. मोहन जाधव, रमेश ठोंबरे यांच्या हस्ते ई-श्रम कार्ड वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी नारायण भोसले, मोहन जाधव, अविनाश नवसारे, शिंदे साहेब,मनाली काळभोर व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

#

Comments are closed

error: Content is protected !!