पिंपरी, दि. ४( punetoday9news):-  सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने सांगवी परिसरातील वस्ती मध्ये आदिलक्ष्य संघटनेकडून नुकतीच ओमिक्रॉन विषाणू संसर्गाविषयी परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

यावेळी नागरिकांनी घ्यावयाची लक्षात, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व लसीकरणाबाबत विशेष प्रबोधन करण्यात आले.
डॉ. विजया अंबेडकर व आशा वडुरकर यांनी १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करताना, या विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता लवकरात लवकर कोविन अँपवर नोंदणी करून लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.

सामाजिक कार्यकर्त्या आदिती निकम यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. या वेळी चिनम्मा राठोड, सुनीता पवार, सविता पवार आदि उपस्थित होते.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!