पिंपरी, दि. ४( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलिसांना नवी सांगवी येथील कीर्ती नगर मध्ये ब्रीडल स्पा सेंटर मध्ये स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली होती . शुक्रवारी सामाजिक सुरक्षा विभागाने याठिकणी छापा टाकला असता त्यांना या स्पा सेंटर मध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .
पोलिसांनी आठ महिलांची या ठिकाणाहून सुटका करत स्पा सेंटर च्या संचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून मॅनेजरला अटक केली आहे .
शेख लतीफ निजाम ( वय २७ , रा . काळेवाडी , मुळ- लातूर ) असे अटक केलेल्या स्पा मॅनेजरचे नाव आहे . तसेच स्पा सेंटरचा चालक मालक पार्थ सारथी महंती ( वय ३५ , रा . शाहु पॅलेस , किर्ती नगर , नवी सांगवी, मुळ – ओडिसा)
याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस नाईक संगीता जाधव यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपींनी ब्रिंडल स्पा ॲन्ड ब्युटी या स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय चालवत , आठ महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करुन घेतला .
सामाजिक सुरक्षा पथकाने शुक्रवारी या स्पा सेंटरवरती छापा टाकून आठ मुलींची सुटका करत मॅनेजरला ताब्यात घेतले आहे . तिथून २३ हजार ३३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत .
Comments are closed