*इयत्ता पहिली ते आठवीची शाळा बंद राहणार.
*नियम न पाळल्यास कडक निर्बंध लावणार.
*नियम न पाळणाऱ्या नागरिकांमुळे तिसऱ्या लाटेचा वाढला धोका.
*बऱ्याचदा जनजागृतीच्या नावाखाली होणाऱ्या कार्यक्रमातही नियमांना हरताळ.
पुणे, दि. ४( punetoday9news):- राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्याचसोबत ओमायक्रॉनचा धोकाही वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता त्यात पुण्याचीही भर पडली असून पुण्यातील पहिली ते आठवीच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यात आज झालेल्या कोव्हिड आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरी हद्दीतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अद्याप जिल्ह्यातील शाळांबाबत निर्णय झाला नाही.
Comments are closed