पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांचे पुणे येथे नुकतेच निधन झाले. त्यांना महानगरपालिकेच्या वतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
या श्रध्दांजलीच्या कार्यक्रमास सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, उप आयुक्त आशादेवी दुरगुडे, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, योगेश वंजारे, आरपीआयचे बाळासाहेब भागवत, स्वप्निल कांबळे, वाहतुक आघाडीचे अजीज शेख, भारतीय बौध्द महासभेचे बापूसाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.
Comments are closed