माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या तर्फे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार.

 

पिंपरी,दि.६ ( punetoday9news):-
पुणे शहाराप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातही पत्रकार भवन असणे आवश्यक आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार भवनबाबत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केले.


दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या वतीने पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, गोर बंजारा समाज संस्थेचे अध्यक्ष संदीप राठोड, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव तुपे, शैलेश दिवेकर आदी उपस्थित होते.


राजेंद्र जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितले, की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे पत्रकारांनी तटस्थपणे पत्रकारिता केली पाहिजे. आज पिंपरी चिंचवड शहरही झपाट्याने वाढत आहे. मात्र, पिंपरी चिंचवड शहरात पत्रकार भवन नाही. इथे पत्रकार भवन असणे खूप गरजेचे आहे. पत्रकार भवनबाबत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे राजेंद्र जगताप म्हणाले.
अरुण पवार यांनी सांगितले, की पत्रकारांनी समाजाचा आरसा बनून वस्तुस्थिती मांडावी. पत्रकारांनी तळागाळातील लोकांना आपल्या लेखणीतून प्रयत्न करावा. भविष्यात पत्रकारांच्या कल्याणकारी योजना राबविण्याचे आपले उद्दिष्ट आहे. लेखणीच्या माध्यमातून समाजव्यवस्था बदलण्याचे मोठे सामर्थ्य पत्रकारांमध्ये असते.
सत्काराला उत्तर देताना पत्रकारांनी आपले अनुभव कथन केले. तसेच आजच्या दिवशी झालेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!