पिंपरी,दि. ६( punetoday9news):-
पिंपळे गुरव येथील शामभाऊ जगताप युवा मंचच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शामभाऊ जगताप यांच्या हस्ते पत्रकारांना गौरविण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तानाजी जवळकर, युवा नेते अमरसिंग आदियाल, सह्याद्री आदिवासी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी.बी. घोडे, जनार्दन इंगवले, संजय कांबळे, अक्षय जगताप, संदीप नलावडे, हिमांशू जगताप, भास्कर सदामते आदी उपस्थित होते.
शामभाऊ जगताप यांनी सांगितले, की पत्रकार हा समाजाभिमूख व समाजशील असतो. समाजातील तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम पत्रकार तळमळीने करीत असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा पत्रकार दिनाच्या निमित्ताने उचित सन्मान होणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिकांपर्यंत विविध बाबींचा व शासनाने वेळोवेळी घालून दिलेले नियम पोहचवण्याचे काम पत्रकार उत्तमरित्या करीत आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. भविष्यात पत्रकारांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास आपण कटिबद्ध आहोत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.बी. घोडे यांनी, तर आभार शामभाऊ जगताप यांनी मानले.
Comments are closed