पिंपळे निलख ,दि ७( punetoday9news):- सांगवी फाटा औंध जिल्हा रुग्णालयाच्या समोर धावत्या टाटा मांझा गाडी जळून खाक झाली. सकाळी ६:४५ वाजता रावेत सांगवी बीआरटी रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या एम. एच १२ जि आर ३०३१ या क्रमांकाच्या टाटा मांझा गाडीच्या पुढील भागात इंजिन मधून अचानक स्पार्किंग झाल्याने पेट घेतला.

वाहन चालकाने प्रसंगावधान राखून वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन त्यातून उडी घेतल्याने मोठा धोका टळला, सकाळची वेळ असल्याने रस्त्यावरही वाहतूक नसल्याने इतर घटना घडली नाही व इतर नुकसान झाले नाही. परंतु आगीची तीव्रता मोठी असल्याने चारचाकी वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले यावेळी सकाळी व्यायाम करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी अग्निशमन दलास फोन करून घटनेची माहिती दिली. औंध अग्निशमन दलाच्या गाडीवरील चालक दत्तात्रय कदम तसेच फायरमन हमीद खान, दादासाहेब यादव यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली यावेळी वाहन चालकाने नाव सांगण्यास नकार दिला तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी वाहतूक सुरळीत केली.

 

#

Comments are closed

error: Content is protected !!