जागा बदलल्याने केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने नकार दिला असल्याची चर्चा.
पुणे, दि. ७( punetoday9news):- केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाची मान्यता रद्द केली आहे. त्यामुळे आघाडी सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार की नाही यावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत . मराठा चेंबरचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी ट्विट केले की, पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित नवीन विमानतळासाठी संरक्षण मंत्रालयाने साईट क्लिअरन्स नाकारला आहे.
संरक्षण मंत्रालयाने साइटची मान्यता रद्द केली आहे. त्यामुळे पुण्यातील नवीन विमानतळाच्या योजनेबाबत राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. पुरंदर येथील जागेच्या निवडीला तत्कालीन फडणवीस सरकारने अंतिम स्वरूप दिले होते. त्यांना संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली होती. मात्र, युतीचे सरकार आल्यानंतर जागा बदलण्यात आली. या नव्या बदलांचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालय आणि केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. संरक्षण मंत्रालयाने परवानगी न दिल्यानंतर आता आघाडी सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुरंदरमध्ये संरक्षण मंत्रालयाने मंजुरी देण्यास नकार दिला. जागेच्या मुद्द्यावरून सातत्याने चर्चेत असणारे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने रद्द केले आहे. त्यामुळे नवीन जागेचा शोध घेताना पिंपरी-चिंचवडजवळील खेड तालुक्यात विमानतळाची मागणी व्हायला हवी. पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित नवीन विमानतळासाठी संरक्षण मंत्रालयाने साइट मंजुरी नाकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला म्हणजेच राज्य सरकारला स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. पुरंदर येथील जागेच्या निवडीला तत्कालीन फडणवीस सरकारने अंतिम स्वरूप दिले होते. त्यांना संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली होती. मात्र, युतीचे सरकार आल्यानंतर जागा बदलण्यात आली. या नव्या बदलांचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालय आणि केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. मात्र, संरक्षण मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे.
Comments are closed