मुंबई, दि. ( punetoday9news):- उद्योग जगतात आधुनिक काळातही टिकून असलेल्या टायटन प्लसनं स्मार्ट चष्म्याच्या शर्यतीत एक पाऊल टाकले असून, त्यांनी टायटन आय एक्स हा स्मार्ट चष्मा लॉन्च केला आहे. त्यामुळे फक्त वाचनासाठी वापरात असलेला चष्माही इतर उपकरणाप्रमाणे स्मार्ट झाला आहे.
टायटनच्या या चष्म्यावर (टायटन आय एक्स Titan EyeX) व्हॉईस कॉलिंगचाही पर्याय आहे. हा चष्मा स्मार्ट ग्लास ट्रू-वायरलेस असून, त्यात क्लियर व्हॉईस कॅप्चरसह ओपन इयर स्पीकर दिला आहे. ब्लू-टूथ व्हर्जन 5.0 या चष्म्यात देण्यात आलं आहे. या स्मार्ट चष्म्याद्वारे तुम्ही कॉल रिसिव्ह करू शकता किंवा रिजेक्टही करू शकता. तसंच गाणी ऐकू शकता. यासाठी स्मार्ट ग्लासच्या डाव्या आणि उजव्या बाजूला टच कंट्रोल देण्यात आलं आहे. हा स्मार्ट चष्मा मिडनाइट ब्लॅक रंगात असून, त्याची किंमत नऊ हजार 999 रुपये आहे.
Comments are closed