मावळ,दि.८( punetoday9news):- प्रा. लक्ष्मण शेलार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या व्यक्तींना शारदाआश्रम प्राथमिक आश्रमशाळा शिरगाव मावळ येथे अमरसवित्री कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
आपण समाजात राहतो समाजाचे काहीतरी देणे लागतो, समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून मागील पाच वर्षांपासून समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना आपल्या आई वडिलांच्या नावाने प्रा.लक्ष्मण शेलार यांच्याकडून अमरसावित्री कार्यगौरव पुरस्कार देण्यात येतो.
त्यामध्ये कर्तृत्ववान महिला, कर्तृत्वावान पुरुष, सामाजिक संस्था, कलाकार यांचा यात समावेश आहे. मोठ्या स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन न करता एखादया गरजू अंध, अनाथ, अपंग, वृद्धाश्रम, अनाथआश्रम, वस्तीगृह, आश्रमशाळा अश्या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात येतो.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आली. शारदाआश्रम प्राथमिक शाळेच्या वतीने उपस्थितांचे स्वागत लोखंडे यांनी केले. यावेळी शारदा आश्रम शाळेतील विविध उपक्रमांची माहिती चव्हाण यांनी दिली. कार्यक्रमात रणजीत जगताप ( प्रदेशाअध्यक्ष : अखिल भारतीय युवक मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य )
गिरीष परदेशी.
( मराठी सिनेअभिनेते) दिनेश ठोंबरे ( अध्यक्ष शिववंदना संघटना महाराष्ट्र) बळीराम शिंदे
( सायकलपट्टू) अक्षय खिरिड(कास्टिंग डायरेक्टर ) यांना सन्मानित करण्यात आले.
अखिल भारतीय युवक मराठा महासंघ तालुका अध्यक्ष शंकर पोकळे, उपाध्यक्ष गणेश पवार, प्रदेश उपाध्यक्ष करणसिंह मोहिते, अखिल भारतीय युवक मराठा महासंघ मावळ तालुका अध्यक्ष चेतन वाघमारे, युवा उद्योजक रामभाऊ गोपाळे, योगेश महाराज चोपडे तसेच शारदाआश्रम शाळेतील सर्व शिक्षक वृंद व काही विध्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाकूरद्वारे , देविदास आडकर यांनी केले तर आभार चेतन वाघमारे यांनी मानले.
Comments are closed