मुंबई ,दि ( punetoday9news):- महाराष्ट्रात करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन संसर्गाची वाढती स्थिती पाहता राज्यातील ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
आपल्या आदेशात सरकारने ओमायक्रॉनचा संसर्ग पाहता काही नवे निर्बंध लागू होत असल्याचं नमूद केलं आहे. या आदेशानुसार १० जानेवारीपासून हे नवे निर्बंध लागू होणार आहेत.
● थिएटर 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
● सलून आणि खासगी कार्यलय 50 टक्के क्षमतेनं सुरु
● पूर्ण लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक बसनं वाहतूक करण्यास मुभा
● हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा
● स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा पूर्णपणे बंद
● महाराष्ट्रात प्रवेश करायचा असेल, तर कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस किंवा आरटी पीसीआ चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक
● हॉटेल्स रेस्टॉरंटमध्येही पूर्ण लसीकरणं झालेल्यांनाच प्रवेश, होम डिलीव्हरी सेवा पूर्णवेळ सुरु राहणार
● एमपीएससी, यूपीएससी परीक्षेसाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी प्रवास करणाऱ्यांना हॉल तिकिटावर प्रवास करण्याची मुभा दिली जाईल
● 24 तास सुरु राहणारी कार्यालयातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडली जाणार
● दुकानं, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांच्या दोन्ही कोविड प्रतिबंधक लसी झालेल्या असणं बंधनकारक.
● लसीचे दोन्ही डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्टॉरंटवर कारवाई होणार.
Comments are closed