पिंपळे गुरव परिसरातील 25 हजार नागरिकांना दिनदर्शिका वाटप
पिंपरी,दि. ९( punetoday9news):- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शाम जगताप यांच्या दिनदर्शिकेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघिरे व माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
दिनविशेष, पंचांग यांचा समावेश असलेल्या या दिनदर्शिकेचे पिंपळे गुरव परिसरातील 25 हजार नागरिकांना घरोघरी जाऊन वाटप करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दिनदर्शिका वाटप करण्यात येत असल्याबद्दल पिंपळे गुरव परिसरामधील रहिवास्यांकडून कौतुक केले जात आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शाम शांताराम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तानाजी जवळकर, युवा नेते अमरसिंग आदियाल, गणेश फुगे आदी उपस्थित होते.
संजोग वाघिरे यांनी सांगितले, की शाम जगताप हे शामभाऊ जगताप युवा मंचच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित आले आहेत, हे स्तुत्य आहे. ही दिनदर्शिका घरातील सर्वांना उपयोगी पडणारी आहे.
नाना काटे यांनीही शाम जगताप यांची दिनदर्शिका आकर्षक असून, नागरिकांना दैनंदिन जीवनात खूप उपयोगी पडणारी आहे, अशा शब्दात कौतुक केले.
शामभाऊ जगताप युवा मंचच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजोपयोगी उपक्रम राबवून जनतेच्या हितासाठी आपण वचनबद्ध असल्याची ग्वाही यावेळी शाम जगताप यांनी दिली.
Comments are closed