पुणे, दि. १०( punetoday9news):- छायाचित्रकार अक्षय माळी हा पुण्यातील सिम्बायोसिस स्कुल ऑफ फोटोग्राफीचा विद्यार्थी. न्यूड फोटोग्राफि बदलाचा दृष्टिकोन बदलावा या संकल्पनेतून त्याने बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात तीन दिवसाचे न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवले.
पण प्रदर्शन भरवल्याने छायाचित्रकाराला धमकीचा फोन आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इतकंच नव्हे तर बालगंधर्व व्यवस्थापनानेही त्याचे प्रदर्शन तातडीने बंद केले आहे. कोणाच्यातरी दबावाखाली येत नागरिकांनी हे प्रदर्शन पाहण्यास बंद केल्याचा आरोप छायाचित्रकार अक्षय माळी याने केला आहे.
Comments are closed