नवी दिल्ली :- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे (Ministry of Information and Broadcasting) ट्विटर अकाऊंट (Ministry of Information and Broadcasting Twitter Account Hacked) आज बुधवारी सकाळी हॅक करण्यात आले.

हॅकर्सनी या खात्याचे नाव ‘एलॉन मस्क’ असे ठेवले. त्यावरून ग्रेट जॉब असं ट्विट देखील केलं होतं. याबाबत मंत्रालयानं माहिती दिली आहे. त्यामुळे आता सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

हॅकर्सने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं ट्विटर अकाऊंट आज सकाळी हॅक केलं. त्यावरून एक मोठा कार्यक्रम होणार आहे, असं ट्विट केलं. त्यानंतर काही फसव्या लिंक देखील या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आल्या होत्या. पण, काही वेळातच मंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. तसेच हॅकर्सने केलेले ट्विट हटवले.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!