पिंपरी,दि.१३ ( punetoday9news):- स्वामी विवेकानंदांनी आंतरराष्ट्रीय विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सर च्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते. पाश्चात्त्य अभ्यासाबरोबर त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यामुळेच तत्कालीन प्राध्यापकांच्या मते स्वामी विवेकानंद एक प्रतिभावक विद्यार्थी होते. त्यांना ‘ श्रुतीधारा ‘ ( विलक्षण स्मरणशक्ती असलेला ) म्हटले जात असे. असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीच्या प्रथम नागरिक महापौर उषा ढोरे यांनी पिंपरी येथे केले.
जय मल्हार क्रांती संघटना पिंपरी चिंचवड व कै हभप शांताराम बाईत प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ‘ स्वामी विवेकानंद शिक्षक गौरव पुरस्कार 2022 ‘ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना महापौर ढोरे यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी उपमहापौर हिराबाई घुले, रविंद्र बाईत, जय मल्हार क्रांती संघटना अध्यक्ष सुभाष जाधव, जनता शिक्षण संस्थेचे सहाय्यक सचिव रामेश्वर होनखांबे, दादा मदने, महात्मा ज्योतिबा फुले मंडळ पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अनिल साळुंके, शेखर गोरगले, शांताराम गोफने उपस्थित होते.
यावेळी विद्या रणधीर, शारदा जगदाळे, शालिनी सहारे, हेमंत बगनर, बाळासाहेब जाधव, अनिल पाटील, चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील या शिक्षकांना शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोहन शिंदे व आभार प्रर्दशन योगेश राणे यांनी केले.
Comments are closed