बारामती तालुक्यातील रहिवाशी युवकांना रोजगाराच्या संधी.

पुणे, दि.१३( punetoday9news):- जीवन टपाल विमा तसेच ग्रामीण टपाल विमा अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या २२ जानेवारी रोजी बारामती येथील मुख्य पोस्ट कार्यालयात बारामती तालुक्यातील इच्छुकांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन पुणे ग्रामीण पोस्ट विभागाकडून करण्यात आले आहे.

उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे यादरम्यान असावी. उमेदवार मान्यता प्राप्त संस्थामधून दहावी, बारावी उत्तीर्ण असावा. विमा क्षेत्रातील माहिती, विपणन कुशलता असणे आवश्यक राहील. बेरोजगार, स्वयंरोजगार व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचे माजी प्रतिनिधी (अभिकर्ता), माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, निवृत्त शिक्षक, स्वयंसहायता बचत गटाचे पदाधिकारी, टपाल जीवन विमा प्रतिनिधी यासाठी पात्र राहतील.

विमा प्रतिनिधी म्हणुन निवड झाल्यानंतर टपाल विभागाने वेळोवेळी ठरवून दिलेले कमिशन तसेच प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. नियुक्त उमेदवारांना आंतरिक प्रशिक्षण देण्यात येईल. परवाना देण्यासाठी २५० रूपये आणि परवाना परिक्षेसाठी २८५ रूपये शुल्क जमा करावे लागणार आहे. निवड झालेल्या उमेदवारास पाच हजार रूपये टपाल बचत खात्यामध्ये अथवा राष्ट्रीय बचत पत्रामध्ये भारताचे राष्ट्रपती यांच्या नावाने तारण म्हणून ठेवावे लागणार आहेत.

बारामती येथील मुख्य पोस्ट कार्यालयात २२ जानेवारी रोजी स. १० वाजेपासून सायं. ४ वाजेपर्यंत थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मुलाखतीस येताना शैक्षणिक प्रमाणपत्रासह पॅन कार्ड, आधार कार्ड, दोन छायाचित्रासह आणि इतर संबंधित दस्ताऐवजांसमवेत उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी व्ही.एस. देशपांडे ९४२०९६५१२२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक डाक घर (पुणे ग्रामीण विभाग) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!