पिंपरी, दि. १५( punetoday9news):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क क्षेत्रिय कार्यालय, अतिक्रमण पथकाच्या मार्फ़त ( दि.१५) अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्या नियंत्रणाखाली प्रभाग क्र. ०२ मधील बो-हाडेवाडी येथील रोड लगतच्या फुटपाथवरील १२ टपऱ्या, मोकळ्या मैदानावरील ४२ झोपड्या व ३२ अनधिकृत पत्राशेड वर अतिक्रमण कारवाई करण्यात आली.
आज सकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत बीट निरीक्षक संतोष शिरसाठ, प्रसाद आल्हाट, निवृत्ती गुणवरे, योगेश शेवलकर, राजश्री सातळीकर , अतिक्रमण निरीक्षक ज्ञानेश्वर केळकर, सुपरवायझर पंकज वाघे, क प्रभाग अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक सहभाग झाले होते. दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे.
नागरिकांनी रस्त्यावर अनधिकृत टप-या व शेड उभारु नये.तसेच फ़ुटपाथ स्वच्छ
ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रभाग क्र. ०२ मधील बो-हाडेवाडी येथील सी.एन.जी. पंम्प ते मोशी भाजी मार्केट रोड लगतच्या फुटपाथवरील १२ टपऱ्या , गोल्ड जीम बो-हाडेवाडी शेजारील मोकळ्या मैदानावरील ४२ झोपड्या व ३२ अनधिकृत पत्राशेड वर अतिक्रमण कारवाई करण्यात आली.
ड क्षेत्रीय कार्यालयाकडूनही पिंपळे गुरव परिसरातील पदपथावरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे अचानक झालेल्या पदपथावरील अतिक्रमण कारवाईने व्यावसायिक, दुकानदारांनी चांगलाच धसका घेतला आहे. तर नागरिकांनी पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे झाल्याने आनंद व्यक्त केला.
Comments are closed