पिंपरी, दि. १६( punetoday9news):- पिंपळे गुरव येथील हर्षदा नामदेव तळपे या विद्यार्थिनीने जुन्या मास्कचे विघटन आणि त्यातून पुनर्निर्मिती करता येणारे मशीन बनविले असून, या मशीनच्या आराखड्याची इंडियन पेटंट जर्नलमध्ये नोंद झाली आहे.


हर्षदाच्या या कामगिरीची दखल घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांनी हर्षदाचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तानाजी जवळकर, युवा नेते अमरसिंग आदियाल, हर्षदाचे वडील नामदेव तळपे आदी उपस्थित होते.

याबाबत शामभाऊ जगताप यांनी सांगितले, की हर्षदाने केलेली कामगिरी प्रेरणादायी आहे. यामागे तिच्या आई-वडिलांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. हर्षदाने बनविलेल्या मशीनच्या आराखड्याची इंडियन पेटंट जर्नलमध्ये नोंद होणे ही निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे. भविष्यात हर्षदाने मोठी भरारी घेऊन पिंपरी चिंचवडचे नाव जागतिक स्तरावर नेईल, असा विश्वास आहे. आज अनेकजण मोबाईलवर टाईमपास करताना दिसतात. मात्र, हर्षदाने आपला वेळ सार्थकी लावत वैविध्यपूर्ण मशीन बनवून आई वडिलांचे नाव रोशन केले.

तानाजी जवळकर यांनीही हर्षदाच्या कामगिरीचे कौतुक करीत सांगितले, की वापरलेल्या मास्कचे विघटन ही मोठी समस्या होती. यावर विचार करीत अशा मास्कचे विघटन करणारी मशीन बनविणे, ही कल्पकता सूचने ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!