लोणावळा, दि. १७( punetoday9news): – करोना संसर्ग वाढू लागल्याने त्याला आळा घालण्यासाठी आता लोणावळा शहरातील प्रवेशद्वारांवर तपासणी नाके लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी वाहनांमधील नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून करोना लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांनाच शहरात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिली आहे .
दुसरी मात्रा घेण्याची मुदत संपल्यानंतरही ती घेतली नसलेल्यांना तत्काळ तपासणी नाक्यावर दिली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिली. खंडाळा येथील शारदा हॉटेल व वलवण गावातील सेंटर पॉइंट येथे तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र उभारून तिथे नागरिकांची प्रतिजन चाचणी केली जात आहे. पर्यटनाला सध्या बंदी असली, तरी सुटीच्या निमित्ताने अनेक पर्यटक लोणावळ्यात येत आहेत. त्यादृष्टीने लसमात्रा घेतल्याची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
Comments are closed