तेरखेडा, दि.१७( punetoday9news):- वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील कै. गोवर्धन भानुदास भोसले यांचा दहाव्या स्मृतिदिनानिमित्त बसवेश्वर बहुद्देशीय संस्थेच्या वतीने बसवेश्वर मंदिर तेरखेडा या ठिकाणी पार पाडला.
कार्यक्रमाची सुरुवात बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशी तालुका अध्यक्ष व सरपंच दिलीप आबा घोलप यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आली.
या स्मृतिदिनाच्या निमित्ताने तेरखेडा गावातील पत्रकार संघ यामध्ये दिलीप बुके (पुण्यनगरी), ज्ञानेश्वर जोशी (दै.सकाळ), विशाल खामकर (दिव्यमराठी), प्रशांत कुदळे (दैनिक लोकमत), वैभव पारवे (दै. सामना), विश्वनाथ जगदाळे (तरुण भारत), मधुकर राऊत (श्रेष्ठ मार्गदर्शन,पत्रकार), या सर्व सन्माननीय पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी बलभीम भोसले यांनी वडिलांच्या कार्याविषयी उजाळा दिला. यावेळी डॉ. संजय भोसले, किसन खोत, सुरेश गोळे, सुरेश भोसले, उद्धव भोसले, सरजू पौळ, सुधाकर जगताप, चंद्रकांत भोसले, नवनाथ माने, बाळासाहेब भोसले, आबू पठाण, विश्वनाथ खामकर, दिलीप भोसले, गुरुप्रसाद मोहिते, जालिंदर भालेराव, मंगेश भोसले, गणेश भोसले, ऋतुराज भोसले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बलभीम भोसले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. महेश भालेकर यांनी केले.
Comments are closed