पुणे, दि. १८( punetoday9news):- नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देताना म्हटले की मी वक्तव्य आपल्या मोदी नावाच्या स्थानिक गुंडाच्या विरोधात केले होते
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून, भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. नाना पटोले यांच्याविरोधात भाजपाकडून नाशिक आणि नागपुरात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाना पटोलेंवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
“नाना पटोले बडबडे आहेत. नाना पटोलेंचं काय अस्तित्व आहे, ते बडबडे व्यक्ती आहेत. त्यांना केवळ शारीरिक उंची आहे, बौद्धिक उंची नाही. बौद्धिक उंची असती तर त्यांच्या बोलण्याला उत्तर दिलं असतं. केवळ शारीरिक उंची असणाऱ्या व्यकीला थोडीच उत्तर दिलं जातं.” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे नितीन गडकरी यांनीही नाना पटोले यांच्या या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यामुळे नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याची भविष्यात मोठे पडसाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे
Comments are closed