दिल्ली, दि. १९( punetoday9news):- टेलीप्रॉम्प्टर हे एक विशेष उपकरण आहे. ज्याच्या सहाय्याने वक्ता आपले भाषण वाचतो. अभिनेते किंवा गीतकार त्यांच्या ओळी बोलण्यासाठी देखील याचा वापर करतात. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वक्त्याला त्याचे भाषण लक्षात ठेवावे लागत नाही. त्यांना जे बोलायचंय ते टेलीप्रॉम्प्टरच्या साहाय्याने तो अगदी सहजपणे बोलू शकतो. यावेळी श्रोत्यांना तो वाचून काहीतरी बोलतोय असं देखील वाटत नाही.
तुम्ही जर एखाद्या नेत्याला भाषण देताना नीट पाहिलं असेल, तर त्याठिकाणी त्यांच्या शेजारी दोन मोठे काच लावलेले असतात. हेच काच टेलीप्रॉम्प्टर ग्लासेस आहेत. त्यावर, नेत्यांना जे बोलायचं असतं ते भाषण चालू असतं. नेत्यांना त्यामध्ये भाषण दिसतं तर, प्रेक्षकांच्या बाजूने तो एक सामान्य काच असल्याचे दिसते.
टेलीप्रॉम्प्टर स्टँडवरील टेलीप्रॉम्प्टर काच 45 डिग्री वाकवून सेट केला जातो. मॉनिटर अगदी त्याच्या खाली ठेवलेला असतो. ज्यावर सॉफ्टवेअरच्या मदतीने स्क्रीप्ट दिसत असते. स्क्रीनवरील ते भाषण वक्ता अगदी सहज वाचू शकतो. पूर्वी त्याचा वेग आणि आकार मॅन्युअली अपडेट केला जायचा. पण आता सर्वकाही ऑटोमॅटिक झालंय. त्यांच्या बोलण्याच्या वेगानुसार टेलीप्रॉम्टरवरील स्क्रीप्ट सरकते. टेलीप्रॉम्प्टर ऑब्जेक्ट मिररिंग आणि रिफ्लेक्शन या तत्त्वावर काम करतात.
Comments are closed