पिंपरी,दि.२०( punetoday9news):-
जेष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील तथा नारायण ज्ञानदेव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत पुष्पांजली व श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
पिंपळे गुरव येथील राजीव गांधी नगरमधील अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित श्रद्धांजली सभेस समाजसेवक विलास थोरात, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, साहेबराव तुपे, राम कुमरे, उत्तम सकटे, बबन काळे, विनायक बनसोडे, विठ्ठल वाघमारे, गणेश कांबळे, उदय ववले, शरद सूर्यवंशी, शहाजी थोरात, दिलीप कारने, एकनाथ खंदारे, सुरेश जोमांडे आदी उपस्थित होते.
या श्रद्धांजली सभेचे आयोजन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदीप गायकवाड यांनी केले होते.
Comments are closed